अर्थसंकल्पात नोकरी आणि रोजगारासाठी विशेष तरतुदी – मुख्यमंत्री

अर्थसंकल्पात नोकरी आणि रोजगारासाठी विशेष तरतुदी – मुख्यमंत्री

मुंबई – आगामी काळात सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या असल्याने तिथे गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. स्टार्टअपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलंस उडान आणि इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 5 लाख रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे ध्येय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.तसेच कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र या योजना आगामी 5 वर्षांत दहा लाख 31 हजार उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन, प्रशिक्षण सुविधांकरिता 90 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करणार असून रेशीम उद्योग विकासातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 3 कोटी रू. निधी प्रस्तावित केला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 दरम्यान अन्नधान्यासाठीही तरतुद केली असून 2017 -18 मध्ये विक्रमी उत्पादन झालं आहे. भूपृष्ठभागावरील पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाल्याने विक्रमी उत्पन्न  झालं असून जलयुक्त शिवारसारख्या प्रकल्पांमुळे हे साध्य झालं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबई विमानतळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून त्यासाठी विकासकामे सुरु झाली आहेत. मुंबई – नवी मुंबई शहरांना जोडणाऱ्या ट्रान्सहार्बर रस्त्याचं काम सुरु झालं असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS