यावर्षीच्या अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतुदी !

यावर्षीच्या अर्थसंकल्पातील कृषीविषयक तरतुदी !

मुंबई – आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी सरकारनं अनेक तरतुदी केल्या आहेत. शाश्वत शेतीसाठी पाणी गरजेचे असल्यामुळे मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, विहरी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. पाहूयात शेतक-यांसाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ते….

– ३११५ कोटी रुपयांची तरतुद पंतप्रधान सिंचन योजेनेसाठी, २६ प्रकल्प

– ८२३३ कोटी रुपयांची तरतुद जलसंपदा विभागासाठी

– पाटबंधाऱ्याचे ५० प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

– जलयुक्त शिवार योजनेसाठी १५०० कोटी

– वनशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी

– सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटी

– रोहयो अंतर्गत आंबा, काजूच्या फळबागांसाठी १०० कोटी रुपये

– कांदा प्रक्रियेसाठी ५० कोटी

– कर्जमाफी अंतर्गत आतापर्यंत ३५.६८ लाख १३६०० कोटी रुपयांचे वितरण

– ९३ हजार कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटींची तरतुद

– एसटी महामंडळाकडून शेतमाल वाहतुक सुरू करण्याची योजना 

– बसस्थानकांच्या पुनर्बांधणी व विकासासाठी ४० कोटी

– रेशीम विकास ३ कोटी 

COMMENTS