मिरा भाईंदर, ठाण्याच्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करा – धनंजय मुंडे

मिरा भाईंदर, ठाण्याच्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करा – धनंजय मुंडे

मुंबई – मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला आवश्यक परवानगी व निधी देण्यात आला असून या भवनाचे काम तत्काळ सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली त्यावेळी मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले, मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर सर्वे क्र. 233, 3800 चौ.मि. जागेवर सांस्कृतिक भवन, विपश्यना केंद्र व बहुउद्देशिय इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मिरा भाईंदर येथील सांस्कृतिक भवनाला 12 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील घोडबंदर रोड परीसरामध्ये कासारवडवली येथील 1700 चौ.मि. सुविधा भूखंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी देण्यात आलेला आहे. ठाणे येथील सांस्कृतिक भवनाला 11 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. या दोन्ही भवनाच्या आवश्यक त्या परवानग्या व निधी देण्यात आला असून काम सुरु करण्याचे निर्देश यावेळी मुंडे यांनी दिले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त बालाजी खतगावकर, तहसिलदार नंदकुमार देशमुख व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS