मुंबई – छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी भुजबळ समर्थक आक्रमक झाले असून याबाबत आज त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज यांचं निवासस्थान असेल्या कृष्णकुंजवर जाऊन सोमवारी या समर्थकांनी भेट घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भुजबळ समर्थकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळांबाबत राजकारण सुरु असून ते ना मी मांडू शकतो ना तुम्ही मांडू शकता. कारण हे प्रकरण कोर्टात आहे. हा गुन्हा आर्थिक विषयावरची असून त्यामुळे या प्रकरणात भुजबळांना जामीन मिळायला हवा होता असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भुजबळ जोडो अभियान हे नाव चुकीचं असून भुजबळ छोडो असं असायला हवं होतं. फक्त समर्थक जोडोनं काय होणार असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच सुडाचं राजकारण देशभर सुरु असून कसेतरी वर्ष सहा महिने काढायचे आहेत. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS