राष्ट्रवादीच्या आमदाराकडून चंद्रकांत पाटलांचा पाहूणचार !

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून चंद्रकांत पाटलांचा पाहूणचार !

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेच्या आमदारानं भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पाहूणचार केला आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा पाहुणचार केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्या निवासस्थानाला भेट दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना दुसरीकडे नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसीला सुरू झाला असल्याचं पहावयास मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीl राजकीय वर्तुळात मोठे फेरबदल होणार असल्याचं बोललं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली होती.त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची नुकतीच एका कार्यक्रमात गळा भेट झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांच्या निवासस्थानी आल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, भाजपचे शहरात 3 आमदार 66 नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीच्या आमदारानं केलेला चंद्रकांतदादांचा हा पाहुणचार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

 

COMMENTS