खासदार उदयनराजे भोसलेंची नाराजी उघड, भाजपमध्ये प्रवेश करणार ?

खासदार उदयनराजे भोसलेंची नाराजी उघड, भाजपमध्ये प्रवेश करणार ?

पुणे – राष्ट्रवादीचेखासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे पक्षावर नाराज असल्याची गेली काही दिवसांपासून चर्चा होती. परंतु त्यांची नाराजी आज उघड झाली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली असून उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल सभेला दांडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल सभेची सांगता आणि पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीने आज पुण्यात भव्य हल्लाबोल सभा घेण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र या सभेला दांडी मारली आहे.

दरम्यान उदयनराजे भोसले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजी आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उदयनराजेंवर टीका केली होती. त्यानंतर उदयन राजे भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले होते. विशेष म्हणजे आज हडपसर येथे एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खासदार उदयन राजेंचे गुणगान गायले असल्याची माहिती आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे उदयनराजे भाजमध्ये प्रवेश करणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS