मुंबई – एसटी कामगार नेते वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या चर्चेत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस एसटी कामगारांचा संप सुरु आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेला चार ते सात हजार रुपयांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव कामगार नेत्यांनी अमान्य केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत यात सुधार करण्याची मागणी कामगार नेते करणार आहेत. गेली चार वर्षे एसटी कामगार वेतन वाढीचा करार प्रलंबित आहे. त्याचबरोबर या कारारात सातवा वेतन आयोगही समाविष्ट करावा ही मागणी कामगारांनी लावून धरली आहे. काल सकाळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यानंतर परिवहन मंत्र्यांशी कामगारांनी बैठकीच्या तेरा फेऱ्या केल्या होत्या. मात्र यात तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनांनी घेतला.
COMMENTS