एकनाथ खडसेंना पुणे एसीबीकडून क्लीन चिट, मंत्रिमंडळात स्थान मिळणार ?

एकनाथ खडसेंना पुणे एसीबीकडून क्लीन चिट, मंत्रिमंडळात स्थान मिळणार ?

पुणे – गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे.  या प्रकरणात एकनाथ खडसे यांना पुणे एसीबीनं क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेलं नसून  खडसेंविरोधातील कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्याचं एसीबीनं म्हटलं आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांना या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चौकशी आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असल्यानं अहवाल निरर्थक ठरल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली होती. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खडसेंना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात  पुन्हा घेतलं जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे खडसेंबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS