मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, 10 पक्षांसोबत युती करणार ?

मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक, 10 पक्षांसोबत युती करणार ?

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याबाबत काँग्रेस  पक्षही तयारीला लागला असून याच पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये कोणकोणत्या पक्षांबरोबर कोणत्या निकषांवर आघाडी करायची याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील लहान मोठ्या 10 पक्षांबरोबर आघाडी करण्याचा काँग्रेसचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बसपा, सपा, रिपाई आदी पक्षांचा समावेश असून इतरही काही पक्षांसोबत युती करण्याबाबत काँग्रेसचा विचार सुरु आहे.

COMMENTS