कर्जमाफीला बँकांमुळे दिरंगाई, रावसाहेब दानवेंचा दावा !

कर्जमाफीला बँकांमुळे दिरंगाई, रावसाहेब दानवेंचा दावा !

पुणे – राज्यभरात शेतकरी कर्जमाफीचा आणि त्यांच्या याद्यांचा सावळा गोंधळ सुरू असताना भाजपचे नेते विविध दावे करुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं जूण काम करत आहेत असं वाटतंय. चुकीच्या लोकांना फायदा होऊ नये म्हणून वेळ होत असल्याचं मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री  सांगत आहेत. तर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मात्र वेगळाच दावा आहे. कर्जमाफीला उशीर होण्यास बँका जबादरार असल्याचा दावा दानवेंनी केला आहे. बँकांनी चुकीच्या याद्या दिल्यामुळे कर्जमाफीला दिरंगाई होत असल्यांच दानवेंचा म्हणणं आहे. परवा मुख्यमंत्र्यांनी तब्बल 15 लाख 42 हजार शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचा दावा केला होता.

विधान परिषदेच्या भाजपच्या उमेदवारीबाबतही दानवेंनी मत व्यक्त केलं. पक्षप्रवक्ते माधव भांडारी यांच्यासारख्या निष्ठावंतना डावलून बाहेरुन आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर नव्या लोकांना पक्षाने संधी दिली नाही तर बाहेरचे लोक पक्षात कसे येतील असा सवाल केला. त्यामुळेच लाड यांना उमेदवारी दिल्याचं दानवे यांनी  सांगितलं.

COMMENTS