उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार ठरला, ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार ठरला, ‘यांना’ उमेदवारी जाहीर!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उत्तर मुंबईतील उमेवार जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे याठिकाणी उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत सस्पेन्स होता. परंतु हा सस्पेन्स आता संपला असून दोन दिवसापूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना याठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेकडुन उत्तर मुंबईसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

दरम्यान या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपने गोपाळ शेट्टी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी भाजपचे तगडे उमेदवार असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिलाच्या रुपाने लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा दिला आहे. 2014 साली उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर निरुपम इथून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते. त्यांना पक्षाने उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे राम नाईक यांचा अभिनेते गोविंदा यांनी उत्तर मुंबईतून पराभव केला होता. हा इतिहास लक्षात घेता. ग्लॅमरस चेहरा दिला तर उत्तर मुंबईत चमत्कार होऊ शकतो अशी आशा काँग्रेसला आहे.

COMMENTS