… अन्यथा संघर्ष अटळ आहे, धनंजय मुंडेंचा सत्ताधाय्रांना इशारा!

… अन्यथा संघर्ष अटळ आहे, धनंजय मुंडेंचा सत्ताधाय्रांना इशारा!

परळी – महानिमिर्ती, महापारेषण,महावितरण वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या आंदोलनाला धनंजय मुंडेंनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ७ जानेवारी रोजी मुंडेंनी येथील पॉवर हाऊसच्या प्रवेश द्वारावर तसेच औष्णिक विद्युत केंद्र युनिट ६, ७ व ८ च्या प्रवेशद्वारावर एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची भेट दिली. “परळी वैजनाथ येथील वीजनिर्मिती करणारे सर्व संच पूर्ववत चालू करा अन्यथा संघर्ष अटळ आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मी स्वतः सर्वांच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न करेन” अशी ग्वाही


मुंडेंनी यावेळी बोलताना दिली.

विज कामगार व अभियंते यांचा होत असलेला संप हा फक्त महाराष्ट्रातील जनता व विजग्राहक यांच्या हितासाठी आहे. सामान्य जनतेसाठी विज कामगार व अभियंते अहोरात्र काम करत असतात. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मुंडेंनी यावेळी केली.

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात. मात्र, त्यांना आपल्या गावांतील तीन – चार वर्षांपासून बंद असलेले वीजनिर्मिती संचदेखील सुरू करता येऊ नयेत ही मोठी शोकांतिका आहे. मी स्वतः MARC कडे दोन आठवड्यात यासाठी अपील करणार आहे. परळीच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. परळीत संच बंद असल्याने इथली व्यापरपेठ मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. येथील वीजनिर्मिती केंद्रामुळे कोळशाच्या वाहतुकीतून सिकंदराबाद झोनला दरवर्षी तब्बल चारशे कोटींचे उत्पन्न होत असते. परंतु, यंदा संच बंद असल्याने रेल्वेचेही नुकसान होत आहे. जवळपास दहा हजारांच्या आसपास लोकांनसमोर बंद संचामुळे बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. आधीच दुष्काळ त्यात बेरोजगारीची कुऱ्हाड त्यामुळे अनेक कुटुंबाना मुंबई – पुण्याकडे स्थलांतर करावे लागत आहे. हे सर्व घडत असताना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मात्र केवळ माझ्यावर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत.” असे प्रतिपादन मुंडेंनी याप्रसंगी केले.

“विज कामगार व अभियंते यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि येथील बंद असलेले सर्व संच पूर्ववत सुरळीत सुरू व्हावेत यासाठी येत्या ९ जानेवारी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेऊ” असे आश्वासन मुंडेंनी दिले आहे. तसेच “जर सरकारने चालढकल केली तर यापुढे सर्वांच्यासोबत न्यायालयीन लढाई असो वा रस्त्यावरची लढाई किंवा सभागृतील लढाई मी कुठेही संघर्षासाठी तयार आहे.” असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

COMMENTS