लोकसभा निवडणूक लढणार नाही-प्रिया दत्त

लोकसभा निवडणूक लढणार नाही-प्रिया दत्त

मुंबई – काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. प्रिया दत्त यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिले असून २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा उल्लेख केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही त्यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतर प्रिया यांनी आपले मौन सोडले होते. काँग्रेस स्वत:च्या आजाराने ग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले होते. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यामुळे निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर आता राहुल गांधी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS