संप नसताना हजारो बालकांचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण ? – धनंजय मुंडे

संप नसताना हजारो बालकांचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण ? – धनंजय मुंडे

मुंबई – अंगणवाडी कर्मचा-यांना लावण्यात आलेल्या मेस्मा कायाद्याला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. अंगणवाडी कर्मचारी जर संपावर गेले तर अनेक कुपोषित बालकांचा मृत्यू होऊ शकतो, यामुळे मेस्मा कायदा लागू केला असल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. परंतु संपकाळात 125  बालकांचा मृत्यू झाला म्हणून अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावणार असाल तर संप नसताना जुलै 17 मध्ये मृत्यू झालेल्या 1448 आणि ऑगस्ट 17 मध्ये मृत्यू झालेल्या 1200 बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्या आणि नंतर मेस्मा लावा अशी मागणीही यावेळी धनंजय मुंडे यांन केली आहे. तसेच ज्यांच्यामुळे या राज्यात कुपोषण कमी झाले त्या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा सरकार रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

COMMENTS