सोलापूर – कर्जमाफीचा गोंधळ काही कमी होताना दिसत नाही. संपूर्ण कर्जमाफीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पहायला मिळत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात असाच गोंधळ समोर आलाय. सोलापूर जिल्ह्यातील 1,22,000 शेतकऱ्यांनी आँनलाईन कर्जमाफी अर्ज भरले. दोन दिवसापूर्वी 4800पाञ शेतक-यांची नावे वेबसाईटर दिसत होती. मात्र त्यामध्ये गोंधळ असल्याचं दिसताच ती नावे वेबसाईटवरुन हटवण्यात आली. बातमी तयार करेपर्यंत फक्त 30 लोकांची ग्रीन लिस्ट वेबसाईटवर दिसत आहे. या 30 लोकांसाठी तब्बल 16,59,204 रुपये मंजूरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आली.
यामध्ये गंमत म्हणजे दोन शेतक-यांना त्यांच्याकडं असलेल्या कर्जाच्या दुप्पट रक्कम मंजुर झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात, औराद शाखेतील, शिवपुत्र बशेट्टी याचं कर्ज होतं 49 हजार 735 रुपये तर त्यांना मंजूर झाले 99 हजार 468 रुपये, याच शाखेतील पुतळाबाई घेरडी यांचं कर्ज आहे 22545 रुपये तर मंजुर झाले 45 हजार 90 रुपये.
दीड लाखांच्यावर कर्ज असेल तर दीड लाखावरील पैसे भरल्याशिवाय कुठलीही रक्कम मंजुर होत नाही. मात्र दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील काही शेतकरी याला अपवाद ठरले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बागाईवाडी शाखेत प्रदीप विलास बोडखे यांचे 1 लाख 81 हजार रुपये कर्ज आहे. त्यांना 1 लाख 19 हजार 910 रुपये मुंजुर झाले आहेत. तर अक्कलकोट तालुक्यातील तुंगी शाखेतील विवेक चव्हाण या कर्जदाराचे 2 लाख 6 हजार 532 रुपये कर्ज आहे. त्यांना 62 हजार 532 रुपये मंजुर झाले आहेत.
COMMENTS