टोलमुक्तीवरुन एकनाथ खडसेंना अजितदादांची साथ

टोलमुक्तीवरुन एकनाथ खडसेंना अजितदादांची साथ

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनादरम्या विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुद्द्यांवरुन जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली. याचदरम्यान भाजपचेच आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी देखील सरकारला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आहे.विधानसभेत एकनाथ खडसेंनी टोलमुक्त महाराष्ट्र अशा घोषणा देत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर टोलमुक्तीच्या मुद्द्यावरुन खडसेंच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनीही सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी केली.

 

टोल फ्री महाराष्ट्र हे धोरण सरकारनं मागे घेतलं आहे का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना केला आहे. तसेच त्याचबरोर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनीही टोलच्या मुद्द्यावरुन खडसेंना साथ दिली. माजी महसूल मंत्र्यांनी आजी महसूल मंत्र्यांना टोल फ्री महाराष्ट्र घोषणेबद्दल विचारले आहे त्यामुळे ही टोल फ्री महाराष्ट्र घोषणा अंमलात येणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

याचदरम्यान टोलमुक्ती आणि रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अजित पवार आणि एकनाथ खडसेंनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही राज्यात ३० हजार कोटीचे १० हजार किलोमीटरचे रस्ते हायब्रीड अॅन्युटीवर बांधणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या रस्त्यांना टोल देखील लागणार नसल्याची माहिती त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

COMMENTS