जाहीर सभेतील भाषणादरम्यान अज्ञाताने भडकावली  हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात !

जाहीर सभेतील भाषणादरम्यान अज्ञाताने भडकावली हार्दिक पटेलांच्या श्रीमुखात !

गुजरात – जाहीर सभेतील भाषणादरम्यान एका अज्ञाताने काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात भडकावली आहे. गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये ही घटना घडली असून याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हार्दिक पटेल जाहीर सभेमध्ये भाषण करत असताना एक अज्ञात अचानक स्टेजवर आला आणि त्याने हार्दिक पटेल यांच्या कानाखाली पेटवली. यानंतर अज्ञात इसमाला कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण सभेमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला.

COMMENTS