“स्मृती इराणी आता नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का?”

“स्मृती इराणी आता नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवणार का?”

नवी दिल्ली – यूपीएच्या काळात निर्भया प्रकरण घडल्यावर त्यावेळी विरोधात असलेल्या स्मृती इराणी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या भेट म्हणून पाठवल्या होत्या. आता उन्नाव आणि कठुआतील बलात्कार प्रकरणानंतर केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी पंतप्रधान मोदींनाही बांगड्या पाठवणार आहेत का? असा प्रश्न पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. तसेच मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवण्याची हिंमत दाखवणाऱ्या स्मृती इराणी या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बांगड्या पाठवण्याचं धाडस करणार आहेत का? असा सवाल हार्दिक पटेल यांनी केला आहे.

दरम्यन स्मृती इराणी उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात गप्प का आहेत ? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या घोषणा देतात. दुसरीकडे भाजपाच्याच राज्यात महिला सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्नाव आणि कठुआ या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांमुळे देशाची मान शरमेने खाली गेली असून देशभरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. तसेत त्यांनी स्मृती इराणींना केलेल्या या प्रश्नामुळे इराणी या हार्दिक पटेल यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS