मुंबई – जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनाच लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खोतकर-दानवे वाद सोडवण्यात आला आहे.
अर्जून खोतकरांना पुढील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची ग्वाही शिवसेनेकडून देण्यात आली असून त्यानंतर अर्जून खोतकरांनी माघार घेतली असल्याची माहिती आहे.
दरम्यान गेली काही दिवसांपासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात जालना लोकसभा मतदारसंघात चांगलाच वाद रंगला होता. लोकसभेसाठी दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा पवित्रा अर्जुन खोतकर यांनी घेतला होता. परंतु या दोन्ही नेत्यांमधील मतभेद दूर करण्यास मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आलं असून जालन्यात रावसाहेब दानवेंनाच उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
COMMENTS