विधानसभेत धनगरी पोषाखात अवतरले जयंत पाटील!

विधानसभेत धनगरी पोषाखात अवतरले जयंत पाटील!

नागपूर – नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून दररोज नवनवीन मुद्दे उपस्थित केले जात आहेत. शेतक-यांच्या विविध प्रश्नांवरुन १२ डिसेंबररोजी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीनं हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्यानंतर बुधवारी धनगरांच्या आरक्षणावरुन आक्रमक झालेल्या जयंत पाटील यांनी चक्क विधानसभेत धनगराच्या पोषाखात प्रवेश केला. त्यावेळी हातात काठी आणि घोंगडं घेऊन अवतरलेल्या जयंत पाटलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 सरकारला राज्यातील धनगर समाजाचा विसर पडला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या मागण्यांची जाणीव करून देण्यासाठीच मी हा पोषाख घातला असल्याचं पाटील म्हणाले आहेत. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. सरकारने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण धनगर समाज हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS