“कमल हासनला गोळ्या घातल्या पाहिजेत”

“कमल हासनला गोळ्या घातल्या पाहिजेत”

मेरठ – अभिनेता कमल हासन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं वक्तव्य अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी केले आहे.

कमल हासन यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादीही आता हिंसक कारवाया करत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभुमीवर हिंदू महासभेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला होता.

‘कमल हासन आणि त्यांच्या सारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही’, असं अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा म्हणाले  आहे.

 

COMMENTS