पंतप्रधान मोदींपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस चांगले पण… – अण्णा हजारे

पंतप्रधान मोदींपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस चांगले पण… – अण्णा हजारे

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आहेत. पण, तरीही आंदोलन होणार, मुख्यमंत्री आज राळेगणसिद्धीत आले याचा अर्थ लोकपालच्या आंदोलनावरून आपण मागे हटणार असा होत नाही. लोकपाल कायद्यासाठी दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत आंदोलन होणार आहे. असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केले. 

देशातील पहिल्या सौर कृषी फीडर योजनेचे मुख्यमंत्री फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे हस्ते रिमोट कंट्रोलने भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे व्यासपीठावर एकत्र होते.
यावेळी अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगेलच आहेत. मात्र, आपण लोकपालच्या आंदोलनावरून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. लोकपालसाठी आंदोलनाची आता तर सुरुवात झाली असून पुढील वर्षी 20 ते 25 फेब्रुवारी 2018 च्या दरम्यान दिल्लीत आंदोलन केले जाणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले

 

COMMENTS