माजी आमदार तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांचं निधन !

माजी आमदार तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांचं निधन !

मुंबई – काँग्रेसचे माजी आमदार तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  अध्यक्ष कुंडलिकराव नागरे यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे.

दरम्यान नागरे यांच्या निधनामुळे परभणी जिल्ह्यात शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते मुळचे जिंतूर तालुक्यातील मौजे सावळी येथील रहिवासी आहेत.परंतु गेल्या पस्तीस वर्षांपासून ते मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते.

COMMENTS