चारा घोटाळा प्रकरण, चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव दोषी !

चारा घोटाळा प्रकरण, चौथ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव दोषी !

नवी दिल्ली – चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव दोषी ठरले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दुमका कोषागार प्रकरणी लालूंना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे आता सहापैकी चार खटल्यात लालूंवरील दोष सिद्ध झाले असून बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची मात्र या घोटाळ्यातून सुटका करण्यात आली आहे. चारा घोटाळ् ठरवलं असून, १२ जणांची सुटका केली आहे.

दरम्यान लालूप्रसाद यादव यांच्यावर डिसेंबर १९९५ ते जानेवारी १९९६ दरम्यान दुमका कोषागारमधून १३.१३ कोटी रुपये बोगस पद्धतीने काढले असल्याचा आरोप आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर आरजेडीचे नेते रघुवंश प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांची खेळी पुन्हा एकदा यशस्वी ठरली असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS