…  मग काँम्रेड डांगे, गणपतराव देशमुखही देशद्रोही का ?

…  मग काँम्रेड डांगे, गणपतराव देशमुखही देशद्रोही का ?

मुंबई – त्रिपुरात विधानसभा निवडणुकीत मिळवलेलं अभूतपूर्व यश भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पचवता येत नाही. हे त्यांच्या कृतीतून आणि बोलण्यातून दिसून येत आहे. विजयी झाल्यानंतर लगेचच भाजपच्या कार्यकर्त्यांनी उन्माद करत आगरतळा येथील लेनिनचा पुतळा बुलडोझर लावून पाडला. त्याचीच री ओढत माध्यमांनी मोठे केलेल्या सुनील देवधर नामक भाजपच्या नेत्याने डाव्या विचारसरणीचे लोक देशद्रोही आहेत अशी मुक्ताफळे उधळली. ही विचारसरणी देशातून संपवून टाकण्याची भाषाही केली.

देवधर महाशयांनी मग त्यांचं हे मत मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही का ? नाशिकहून पायपीट करुन डाव्या पक्षाच्या झेंड्याखाली मुंबईत धडकलेल्या शेतक-यांना भेटण्यासाठी तीन तीन मंत्री का पाठवले ? ते तर डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. तुमच्या सुपीक मेंदूनुसार ते तर देशद्रोही. त्यांना तिथेच गोळ्या घालायला हव्या होत्या. तिथेच त्यांना मारायला हवं होतं. तसं न करता तुमच्या मुख्यमंत्यांनी मंत्र्यांना तिथे पाठवले. त्यांना अगदी लिखीत आश्वासन दिले. एवढं करण्याची काय गरज होती?

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेही देशद्रोही होते का ?  सध्याच्या विधानसभेत सर्वात ज्येष्ठ आमदार असलेले आणि सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम केलेले शेकापचे आमदार गणपतराव देशमुखही देशद्रोही आहेत का ?  काही दिवसांपूर्वी गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांचा विधीमंडळातर्फे सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी तुमच्या मुख्यमंत्र्यासंह, गिरीष बापट,सुधीर मुनगंटीवारांसह अनेक मंत्र्यांनी गणपतरावांची तोंडभरुन स्तुती केली होती. मग ती खोटी होती का ? आणि त्यांच्याही मते गणपतराव देशमुख, भाई जयंत पाटील हेही देशद्रोही आहेत का ?

संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समिती अग्रेसर होती. ते सर्वच जण नंतर शेकापच्या झेंड्याखाली एकत्र आले. मग ते सगळेच द्रेशद्रोही होते का ?  विजयाचा एवढा उन्माद करु नका. देशात सर्वशक्तीमान म्हणून गणल्या गेलेल्या इंदिरा गांधींनाही पराभवाची चव चाखावी लागली होती. चांगलं काम केलं तर जनता डोक्यावर घेते आणि चुकलात तर पायदळीही तुडवते हे देवधरांनी लक्षात ठेवायला हवे.

COMMENTS