2019 मध्ये प्रादेशिक पक्षांना सर्वाधिक जागा, देशातील आघाडीचे पत्रकार पेरी महेश्वर यांचा अंदाज ! काँग्रेस आणि भाजपला किती मिळणार जागा ?

2019 मध्ये प्रादेशिक पक्षांना सर्वाधिक जागा, देशातील आघाडीचे पत्रकार पेरी महेश्वर यांचा अंदाज ! काँग्रेस आणि भाजपला किती मिळणार जागा ?

उत्तर प्रदेशमधील बहुचर्चीत लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेल्या पराभवानंतर आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विविध अंदाज आणि तर्कवितर्क मांडले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक झाली. त्याच जागांवर भाजपचा पराभव झाला. त्यामुळे उलटे वारे सुरू झाले आहेत अशी कुजबूज राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. गोरखपूरसारख्या अभेद्य बालेकिल्याला तडे गेल्यामुळे यूपीत भाजप सपशेल मार खाणार आणि बुवा भतीजा ही जोडी कमाल करणार असांही अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ पत्रकार मेरी महेश्वर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत अंदाज व्यक्त केला आहे. आऊटलूकसारख्या साप्ताहिकात त्यांनी अनेकवर्ष काम केले आहे. देशातले आघाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

काँग्रेसला 2019 मध्ये 140 च्या आसपास जागा मिळतील, भाजपला 160 च्या आसपास तर प्रादेशिक पक्षांना 240 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज मेरी महेश्वर यांनी व्यक्त केला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, छत्तिसगड, गुजरात, पदुचेरी, झारखंड, अरुणाचलप्रदेश,  आसाम, नागालँड, मिझोराम आणि मेघालय या 18 राज्यांमध्ये 230 जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसला सुमारे 125 जागा मिळतील असा अंदाज महेश्वर यांनी व्यक्त केला आहे. इतर राज्यातून 15 जागा मिळतील अशा एकूण 140 जागा काँग्रेसला मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तामिळनाडू,  केरळ, पद्दुचेरी,  आंध्रप्रदेश, तेलंगाणा, आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 144 जागा आहेत. यामध्ये भाजपला एखदा दुसरा अपवाद वगळता फारसं काही मिळणार नाही असं महेश्वर यांचं मत आहे. तर गेल्यावेळी अतिशय चांगली कामगिरी करणा-या बिहार, झारखंड, आणि उत्तर प्रदेश या राज्यात भाजपला 2019 मध्ये पुनरावृत्ती करता येणार नाही. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 134 जागा आहेत. त्यापैकी 2014 मध्ये भाजपला 113 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र जवळपास 60 जागा कमी होतील असा अंदाज आहे.

गेल्यावेळी जवळपास 100 टक्के यश मिळवलेल्या राज्यात भाजपला 2019 मध्ये 50 टक्के तोटा होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी भाजपने गुजरातमध्ये 26 पैकी 26, मध्य प्रदेशात 29 पैकी 27, राजस्थानमध्ये 25 पैकी 25, हरियाणात 10 पैकी 9, दिल्लीत 7 पैकी 7, हिमाचलप्रदेशात 4 पैकी 4, महाराष्ट्रात मित्र पक्षाच्या मदतीने 48 पैकी 42, छत्तिसगडमध्ये 10 पैकी 10, जम्मु काश्मिरमध्ये 6 पैकी 6, गोव्यात 2 पैकी 2, उत्तराखंड 5 पैकी 5 आणि झारखंडमध्ये 14 पैकी 14 जागा जिंकल्या होत्या. पोटनिवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजपला यामधल्या 50 टक्के तरी जागा राखता येतील की नाही याबाबत साशंकता आहे.

देशभरातील जागा आणि विविध पक्षांची सध्याची कामगिरी आणि ट्रेंड पहात भाजपा 160 च्या आसपास जागा मिळतील. काँग्रेसला 140 जागा मिळतील. तर प्रादेशिक पक्षांना 240 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे 2019 मध्ये केंद्रातलं सरकार हे प्रादेशिक पक्षांच्या टेकूवर आभारलेलं आघाडीचं सरकार असेल असं भाकित मेरी महेश्वर यांनी केलं आहे. मेरी महेश्वर यांनी त्यांच्या फेसबूक वॉलवर हे अंदाज व्यक्त केले आहेत. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10160343754915151&id=533685150

COMMENTS