नाशिक – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना उमेदवारी मिळाल्याने त्या नाराज आहेत. त्यामुळे पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. परंतु यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भारती पवार यांना भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून भाजपाचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS