सांगली – राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापित करावे असं जानकर यांनाी म्हटलं आहे. त्यासोबतच कार्यकर्त्यांनी आपली औकात आपल्या चौकात तरी दाखवावी, असा टोला देखील महादेव जानकरांनी कार्यकर्त्यांना लगावला.
तसेच आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटकं बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा.’ अशा कानपिचक्या जानकर यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.
दरम्यान यापूर्वीही महादेव जानकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पक्षात जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यकर्ते 25 हजार रुपये द्यायला तयार आहेत, अशा वक्तव्याचा त्यांचा व्हिडीओ होता. त्यामुळे जानकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
COMMENTS