मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौ-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार – सूत्र

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौ-यानंतर मंत्रिमंडळ विस्तार – सूत्र

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या अमेरिका आणि कॅनडाच्या दौ-यावर गेले आहेत. ते भारतात परत आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी खात्याचं मंत्रिपद खाली आहे. ते चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडं राजीनामा सुपूर्त केला आहे. त्यामुळे त्यांच्याही जागी नवा चेहरा येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे उद्धव आणि अमित शहा भेटीमध्ये ठरल्यानुसार शिवेसनेला राज्यात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दोन राज्यमंत्री पदं शिवसेनेला दिली जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागणार याची उसुकता लागली आहे. तसंच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होतं का ? याचीही उत्सुकता लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच आता रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही होण्याची शक्यता आहे.

COMMENTS