मनसेला जोरदार धक्का, शिशिर शिंदे  ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत घरवापसी ?

मनसेला जोरदार धक्का, शिशिर शिंदे ‘या’ दिवशी करणार शिवसेनेत घरवापसी ?

मुंबई – शिववसेनेनं मनसेला जोरदार धक्का दिला असून मनसे नेते शिशिर शिंदे येत्या 19 जूनला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन असून याच दिवशी शिंदे शिवसेनेत घरवापसी करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशिर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशिर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठी खिंडार पडणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.  तसेच राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

COMMENTS