ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर !

ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर !

नवी दिल्ली – देशातील इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशातील राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या दहा क्रमांकमध्येही नसून थेट 13 व्या क्रमांकावर गेला  आहे. वर्ल्ड बँक आणि औद्योगिक धोरण आणि पदोन्नती विभागाने देशातील इज ऑफ डुई़ग बिझनेसमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशातील राज्यांची यादी जाहीर केली आहे.

दरम्यान या यादीमध्ये आंध्र प्रदेशने सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला असून आंध्रनंतर तेलंगणा, हरियाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक आहे. तसेच मागासलेले राज्य म्हणून ओळख असलेले झारखंड राज्यही इज ऑफ डुई़ग बिझनेसमध्ये महाराष्ट्राच्या पुढे गेले आहे.  इज ऑफ डुई़ग बिझनेससाठी 327 गुण विविध उपाययोजनांसाठी दिले जातात. यामध्ये देशातील फक्त सात राज्यांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

दरम्यान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि व्यायसायिक वातावरण सुधारण्यासाठी इज ऑफ डुई़ग बिझनेस हे महत्त्वाची कामगिरी बजावत आहे.

COMMENTS