मुंबई – गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात काल सायंकाळी दाखल केलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती आहे. काल अचानक उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारीच ते अमेरिकेतून उपचार घेऊन गोव्यात आले होते.
दरम्यान अमेरिकेतील स्लोन केटरिंन रुग्णालयात 11 दिवस उपचार घेऊन पर्रिकर परतले होते. आज ते वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभाग घणार होते. परंतु अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान गोव्यातील उर्जामंत्री पांडूरंग मडकईकर यांची देखील प्रकृती खाल्यावल्यामुळे गेली तीन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा हे देखील अमेरिकेला उपचार घेण्यासाठी गेले आहेत. तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई हे विदेशात खासगी भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे गोव्यातील प्रशासकीय कामे रखडली आहेत.
COMMENTS