मंत्रालय आता मंत्रालय राहिलं नाही, आणखी एक धक्कादायक घटना !

मंत्रालय आता मंत्रालय राहिलं नाही, आणखी एक धक्कादायक घटना !

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयामध्ये आत्महत्येचं सत्र सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वीच धर्मा पाटील या शेतक-यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर आणखी एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून  मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणानं केलं आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न अविनाश विठ्ठल शेटे या तरुणानं केला आहे. अविनाश हा अपंग असून तो अहमदनगर येथील रहिवाशी आहे. आत्महत्येचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे.

अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणानं सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र या परिक्षेचा सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारावा लागत होत्या. फे-या मारुनही कोणी दखल घेतल नसल्यामुळे आज मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगवार रॉकेल ओतून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसापूर्वीच आणखी एका तरुणानं आत्महत्याचे प्रयत्न केला होता. त्यापूर्वी धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे आता आणखी एका तरुणानं आत्महत्याचा प्रयत्न केल्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. सतत घडणा-या या घटनांमुळे आतात मंत्रालय मंत्रालय राहिलं नसल्याची भावना सामान्य नागरिकांची झाली आहे.

 

 

COMMENTS