तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

तूर उत्पादक शेतक-यांना दिलासा, मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय !

मुबंई –  तूर खरेदीची सध्याची एकरी मर्यादा कमी असल्याने शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी तूर खरेदीची एकरी मर्यादा वाढविण्यात आली असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिली आहे. राज्यभरात 160 केंद्रावर हमीभावाने तूर खरेदी 1 फेब्रुवारीपासुन सुरू झाली आहे. तूर हे आंतरपीक असल्यामुळे किमान आधारभूत किंमत योजनेतर्गत तूर खरदीसाठी आतापर्यंत उत्पादकता ठरविण्यासाठी तूर पेऱ्याखाली असलेल्या क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्र ग्राह्य धरण्यात येत होते .ते क्षेत्र आता 100 टक्के ग्राहय धरण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तूर हे आंतरपीक असले तरी लागवडीखालील क्षेत्र मोजतांना 100 टक्के क्षेत्र ग्राहय धरण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शासनाला शेतक-यांकडून आता असलेल्या निकषांपेक्षा जास्त तूर हमी भावाने खरेदी करता येणार आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगीतले.

COMMENTS