भाजपचा डाव यशस्वी होऊ देणार नाही –मायावती

भाजपचा डाव यशस्वी होऊ देणार नाही –मायावती

नवी दिल्ली – बहूजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर दोरदार टीका केली आहे. राज्यसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीत भांडण लावून देण्याचा भाजपाचा डाव होता परंतु मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचं मायावतींनी म्हटलं आहे. तसेच मायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल असे भाजपाला वाटत असेल परंतु मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मायावतींनी म्हटलं आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातून एकूण १० उमेदवार राज्यसभेवर जाणार होते. त्यात भाजपाच्या आठ आणि समाजवादी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय सुनिश्चित होता. परंतु भाजपाने बसप आणि सपाच्या मतांमध्ये फाटाफूट घडवून अनिल अग्रवाल यांच्या रुपाने आपला नववा उमेदवारही निवडून आणला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. तसेच भाजपला मतदान करणारे आमदार अनिल कुमार सिंह यांची मायावती यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

COMMENTS