“भाजपनं विश्वासघात केला”, आणखी एक मित्रपक्ष एनडीएतून बाहेर !

“भाजपनं विश्वासघात केला”, आणखी एक मित्रपक्ष एनडीएतून बाहेर !

नवी दिल्ली – भाजपला जोरदार धक्का बसला असून टीडीपीनंतर आता आणखी एका मित्रपक्षानं एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रातील ‘एनडीए’ सरकारवर मित्रपक्षांच्या नाराजांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चा हा पक्ष ‘एनडीए’तून बाहेर पडला आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारसोबत आपला यापुढे कोणताही संबंध नसल्याचं गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष एलएम लामा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपने गोरखांसोबत विश्वासघात केला असून यापुढे भाजपसोबत आपला कोणताही संबंध राहणार नसल्याचं एलएम लामा यांनी म्हटलं आहे. दार्जिलिंग लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जसवंत सिंह यांना गोरखा जनमुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला होता. परंतु त्यानंतर भाजपने लोकांना धोका दिला असून भाजपमुळेच दार्जिलिंगमधील लोक अविश्वास व्यक करत असल्याचा आरोप एलएम लामा यांनी केला आहे. तर भाजप आणि गोरखा जनमुक्ती मोर्चा यांच्यातील युती ही केवळ निवडणुकीपुरती होती असं वक्तव्य पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले होते. त्यानंतर लामा यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चानं घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे.

 

 

 

COMMENTS