१९८४ मधील शीखविरोधी हिंसाप्रकरणी नवीन एसआयटी स्थापन !

१९८४ मधील शीखविरोधी हिंसाप्रकरणी नवीन एसआयटी स्थापन !

नवी दिल्ली –  १९८४ मध्ये झालेल्या शीख विरोधी हिंसाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नवीन एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीद्वारे १८६ प्रकरणांचा तपास केला जाणार आहे. या एसआयटीमध्ये निवृत्त न्यायाधीस, सेवेत असलेले आणि निवृत्त आयपीएस अधिकारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. सुपरवाइजरी पॅनलच्या अहवालात २३९ प्रकरणांपैकी १८६ प्रकरणे तपास न करताच बंद केले असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या १८६ प्रकरणाचा तपास करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

१९८४ मध्ये झालेल्या या हिंसाचारात ३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे पूत्र राजीव गांधी आणि दिल्लीच्या पोलीस अधिका-यांनी हा हिंसाचार घडवला असल्याचं सीबीआयनं म्हटलं होतं. या हिसाचारातील २३९ पैकी १८६ प्रकरण प्रलंबित आहेत. त्यांचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं एसआयटी स्थापन केली आहे.

COMMENTS