सैराटफेम आर्ची, परश्या आणि नागराज मंजुळेंचा मनसेत प्रवेश !

सैराटफेम आर्ची, परश्या आणि नागराज मंजुळेंचा मनसेत प्रवेश !

मुंबई – सैराट या मराठी चित्रपटातील मुख्य कलाकार आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु, परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज मनसेत प्रवेश आहे.महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं त्यांनी सभासदत्व स्वीकारलं आहे. या तिघांच्याही प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका असं आवाहन मनसेच्या चित्रपट सेनेनं केलं आहे.

दरम्यान चित्रपट क्षेत्रातल्या अनेक लोकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मनसेची चित्रपट सेना काम करत असल्याचं बघून या तिघांनीही या संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया मनसेनं दिली आहे. तसेच आमच्या संघटनेचं काम पाहून त्यांनी प्रवेश केला असल्याचंही मनसेनं म्हटलं आहे.

 

COMMENTS