देशभरातील अंगणवाडी सेविकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

देशभरातील अंगणवाडी सेविकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा !

नवी दिल्ली – देशभरातील अंगणवाडी सेविकांसाठी पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या अंगणवाडी सेविकांना 3 हजार मानधन मिळतं त्यांना आता 4 हजार 500 रुपये मानधन दिलं जाणार आहे. तर ज्या सेविकांना 2250 मानधन मिळत होतं त्यांना 3 हजार 500 रुपये मानधन दिलं जाणार आहे. तसेच अंगणवाडी सहाय्यकांना 1500 रुपयांऐवजी 2200 रुपये दिलं जाणार आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेमुळ देशभरातील जवळपास 14 लाख अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी ‘नरेंद्र मोदी ऍपद्वारे केली आहे. तसेच हे वाढीव मानधन पुढच्या महिन्यापासून दिलं जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा कवचही दिलं जाणार आहे. त्यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS