मोदींसाठी खास गिफ्ट, असं गिफ्ट ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही !

मोदींसाठी खास गिफ्ट, असं गिफ्ट ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजपर्य़ंत अनेक गिफ्ट मिळाली असतील. मात्र आता त्यांना एक असं गिफ्ट मिळणार आहे. ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. इस्त्राईलचे पंतप्रधान बँजामिन नेतानॅव्हू हे गिफ्ट मोदींना देणार आहेत. येत्या काही दिवसात इस्त्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौ-यावर येणार आहे. त्या दौ-यात ते गिफ्ट मोदींना देणार आहेत. ते गिफ्ट ईस्त्राईलहून भारताकडं रवाना केल्याची माहिती आहे.

गेल्या जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ईस्त्राईलच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी ईस्त्राईलचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांनी एका जीपमधून प्रवास केला होता. ही आगळीवेगळी आणि खास जीप आहे. या जीपमध्ये पाण्याचं शुद्धीकरण करण्याचं यंत्र आहे. समुद्राचं पाणी या जीपमधील यंत्रामुळे शुद्ध करता येतं. ते एवढं शुद्ध करता येत की ते पिण्यायोग्य होतं. दोन्ही नेत्यांनी त्यावेळी यंत्रातून शुद्ध झालेलं पाणी पिलं होतं. आणि या जीपची किंमत आहे 1 लाख 10 हजार डॉलर्स. एवढं महागडं गिफ्ट मिळालं तरी हरकत काहीच नाही. मात्र मार्केटिंगचा भाग म्हणूनही हे गिफ्ट मोदींना दिलं जात असण्याची शक्यता आहे.

COMMENTS