“मोदींना साहित्य संमेलनाच्या कोणत्याच कार्यक्रमाला बोलवू नका!”

“मोदींना साहित्य संमेलनाच्या कोणत्याच कार्यक्रमाला बोलवू नका!”

मुंबई – बडोदा येथे ९१  वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोपाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु मोदींना या साहित्य संमेलनासाठी कोणत्याच कार्यक्रमाला बोलवून नका असं आवाहन ‘गोविंद पानसरे अभिवादन समिती’ने केलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना साहित्यिकांवर अनेक हल्ले झाले असून अजूनही होत आहेत. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला बोलवू नका असा पवित्राच या समितीनं घेतला आहे.

धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, विज्ञानवादी विचार मांडणाऱ्या विचारवंताना विचार मांडताना झुंडशाहीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे काही साहित्यिकांनी आपले पुरस्कारही परत केलेत. या सर्व घटनांवर मोदी मौन बाळगून आहेत, असे समितीचे सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधानांच्या आर्थिक नियोजनामुळे महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. मराठीवरील त्यांचे प्रेम कुठेच दिसत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS