पंतप्रधान नरेंद्र मोदीचं इम्रान खान यांना पत्र, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा निमंत्रण दिल्याचा दावा !

पंतप्रधान नरेंद्र मोदीचं इम्रान खान यांना पत्र, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा निमंत्रण दिल्याचा दावा !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहिलं असल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहाद कुरेशी यांनी केला आहे. या पत्रामध्ये मोदी यांनी भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होणे गरजेचं असून त्यासाठी पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांना निमंत्रण दिलं असल्याचं कुरेशी यांनी म्हटलं आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होणे गरजेचे आहे. शेवटी आपण शेजारी राष्ट्र आहोत. दोघांमध्ये प्रलंबित वाद असून चर्चेशिवाय पर्याय नसल्याचंही कुरेशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी भारत – पाकमधील वाद गुंतागुंतीचे असून ते सोडवताना असंख्य अडथळे येतील. पण संवादाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली पाहिजे. काश्मीरमधील परिस्थितीही स्वीकारली पाहिजे तसेच  वस्तूस्थिती स्वीकारुन भारत – पाकिस्तानने पुढे गेले पाहिजे, असे पत्रामध्ये नमूद केलं असल्याचं कुरेशी यांनी म्हटलं आहे. परंतु पाकिस्तानच्या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS