मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मोठा अनर्थ टळला !

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मोठा अनर्थ टळला !

नागपूर – शेतकरी धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर चौघांनी  आज आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

काही दिवसांपूर्वीच या कर्मचा-यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे यांनी शेवटी टोकाचं पाऊल उचललं होतं. २००२ मध्ये या चौघांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांना पालिका प्रशासनाने पुन्हा सेवेत घेतले नव्हते. आम्हाला पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात यावे अशी मागणी या चौघांनीही केली होती. त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धाव घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने अचानक अंगावर रॉकेल ओतून घेतले, मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

COMMENTS