नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला !

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला !

मुंबई – नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजमधील तणाव वाढला असल्याचं दिसून येत आहे. कारण सुभाष देसाई यांनी नाणार नोटिफिकेशन रद्द केली असल्याची घोषणा केली होती. परंतु सुभाष देसाईंनी नोटिफिकेशन रद्द करण्याबाबतचं मत व्यक्त केलं आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, सरकारचं मत नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी केलं आहे. तसेच नोटिफिकेशन रद्द करण्याचा अधिकार फक्त ( मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ) हाय पॉवर कमिटीला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान नोटिफिकेशन रद्द करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव कमिटीसमोर अद्याप आलेला नसून त्यामुळे राज्याच्या आणि कोकणाच्या हिताचा निर्णय सरकार घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच नाणार प्रकल्पाचं नोटिफिकेशन रद्द केलं नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पावरुन पुन्हा एकदा शिवसेना भाजपमधला तणाव वाढला असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS