नाशिकमधील ‘त्या’ चोरीमध्ये राजकीय कनेक्शन ?

नाशिकमधील ‘त्या’ चोरीमध्ये राजकीय कनेक्शन ?

नाशिक – नाशिकच्या बॉश कंपनीतील 10 कोटी 66 लाख रुपयांच्या चोरीमध्ये राजकीय कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे. या कंपनीतील स्पेअर पार्टची चोरी आणि मोल्डिंग करून बाजारात विक्री केली होती. त्याप्रकरणी शिवसेना नगरसेविकेचा पती बाळा दराडेची 2 तास  चौकशी करण्यात आली आहे. तसेच भाजप नगरसेवक मुकेश शहाणे आणि शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांचा पुत्र सचिन राणे यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे.

या कंपनीतील स्पेअर पार्ट्सची चोरी करण्यात आली होती. त्यानंतर या पार्ट्स मोल्डिंग करुन बाजारात विक्री करण्यात आली होती. याची किंमत १० कोटी ६६ लाख असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तसेच या चोरीबाबत मुख्य संशयित आरोपी छोटू चौधरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बाळा दराडे, मुकेश शहाणे, सचिन राणे यांची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चौकशी सुरु असून यामध्ये आता राजकीय कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे.  या चौकशीनंतरच आता खर काय ते उघड होणार आहे.

COMMENTS