वाढत्या फेरीवाल्यांमुळे नाशिककर त्रस्त,राजकीय पुढा-यांचा फेरीवाल्यांना पाठिंबा !

वाढत्या फेरीवाल्यांमुळे नाशिककर त्रस्त,राजकीय पुढा-यांचा फेरीवाल्यांना पाठिंबा !

नाशिक – नाशिकमध्ये फेरीवाल्यांमुळे शहराच्या वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस फेरीवाल्यांचं जाळं वाढत असल्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. राजकीय हितसंबंध, शासनाचा नाकर्तेपणा या कारणांमुळे शहराच्या रहदारीच्या ठिकाणी फेरीवाले आढळून येत आहेत. त्यामुळे या फेरिवाल्यांना हटवण्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

दरम्यान शहरात गेल्या काही वर्षांपासून हॉकर्स झोन करण्याची मागणी पुढे येत आहे, त्यादृष्टीने काही गोष्टी मार्गीही लागल्या आहेत. जसे शालीमार परिसरात तिबेटीयन लोकांकडून उबदार कपड्यांचा व्यवसाय हा अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी सुरू असायचा, त्याला उपाय म्हणून तिबेटीयन मार्केटची उभारणी करून त्यांना स्थलांतरी करण्यात आले. मात्र काही दिवसातच त्या जागेवर काही स्थानिक लोकांनी राजकीय पुढा-यांच्या आर्शिवादाने तेथे पुनश्च बस्तान बसवायला सुरूवात केली. आज त्या भागातून चालणे सुद्धा अवघड झाले आहे. तशीच अवस्था मेनरोडची आहे. जून्या महापालिकेच्या अगदी दरवाजाच्या बाहेरच या फेरीवाल्यांचा गराडा असता त्यावरून असंख्य वेळा वादही झाले आहेत.

स्थानिक रहिवाशांच्या आणि व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार त्या त्या भागातील राजकीय बडी धेंडच या लोकांना पाठीशी घालतात. निवडणुकीच्या काळात त्यांना याच लोकांचा उपयोग होत असल्याचे दबक्या आवाजात सांगतात. त्यामुळे महापालिकेने कितीही हॉकर्स झोन केले तरी तिथे किती जण स्थलांतरीत होतील हा विचार करण्याचीच गरज आहे.

महाालिकेने हॉकर्स झोन तयार केले आहेत, ते त्या व्यावसायिकांच्या दृष्टीने योग्य नाहीत, ते तेथे स्थलांतरीत होण्यास तयार नाही, तेथे कोण येणार ? असा उलट प्रश्न हे व्यावसायिक करतात. या मुद्याांवरून आहे तीच परिस्थिती आहे. शहराच्या मध्यवर्ती अशी रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, मेन रोड, शालीमार, एमजीरोड येथे मोठ्या प्रमाणात या व्यावसायिकांचे अतिक्रमण पहावयास मिळत आहे.

 

 

COMMENTS