चंद्रकांत पाटलांकडून नवीन वर्षाचं आगळंवेगळं स्वागत !

चंद्रकांत पाटलांकडून नवीन वर्षाचं आगळंवेगळं स्वागत !

कोल्हापूर – महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी गाणं गाऊन नवीन वर्षाचं  स्वागत केल आहें. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी कोळी गीत गाऊन सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझी माझी… जमली जोडी’ हे कोळी गीत चंद्रकांत पाटील यांनी गायलं. त्यांनी गायलेल्या सर्वांनीच त्यांच टाळ्या वाजवून कौतुक केलं.
 
कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या सावली केअर सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजकारणावर भाष्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना गाणं गाताना पाहून सगळ्यांनीच त्यांच्यासोबत ताल धरला. याच निमित्ताने महसुल मंत्र्यांचा हटके अंदाज सगळ्यांनाच पहायला मिळाला.

COMMENTS