नृपाली देशपांडे
नाशिक – महापालिकेतर्फे शहर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. मात्र कामांच्या अंमलबजावणीत आणि त्यासाठी लागणा-या डस्टबिन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. आजच्या महासभेत या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डस्टबिन खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत घोटाळ्याच्या चौकशी करण्याची मागणी करणारे फलक फ़डकावले.
अवाजवी दराने खरेदी केलेल्या या डस्टबिन प्रकरणी विरोधकांसह काही सत्ताधारी सदस्यांनीही या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची महापौरांनी दखल घेत येत्या महासभेत त्या संबंधिचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या ठिकाणी हे डस्टबिन बसविण्यात आले आहेत मुळात तेथे ते बसविण्याची गरज आहे का ? डस्टबिनविषयी शहरातील नागरिकांना कोणते आवाहन करण्यात आले आहे का ? त्याची नियमित स्वच्छतेची कोणती व्यवस्था करण्यात आली आहे ? यासारखे प्रश्न अनुत्तरीत असताना डस्टबिनचा खरेदीतील घोटाळ्याचीच मोठी चर्चा सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील शौचालय, गोदावरीचे होणारे प्रदुषण, शहराचा वाहनतळांचा प्रशद्ब्रा यासारखे प्रशद्ब्रा गंभीर असताना सोयीस्कररित्या त्याकडे दुर्लक्ष करून इतर गोष्टीतून आर्थिक हितसंबंध कसे जोपासले जात आहेत याचाच प्रत्यय या निमित्ताने शहरवासियांना येत आहे.
COMMENTS