राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, ‘या’ आमदाराचा राजीनामा!

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, ‘या’ आमदाराचा राजीनामा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला असून
उल्हासनगरच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार ज्योती कलानी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. तसेच ज्योती कलानी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. परंतु दुसय्रा बाजूला त्या भाजपमध्ये जातील अशीही चर्चा आहे.

दरम्यान 2017 मधील उल्हासनगर महापालिका निवडणुकांपासून व कलानी कुटुंब भाजपच्या संपर्कात आहे. ज्योती कलानी यांच्या सूनबाई पंचम कलानी या भाजपच्या तिकीटावर उल्हासनगरच्या महापौरपदी निवडून आल्या आहेत. त्यापाठोपाठ कलानी कुटुंबालाही भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्योती कलानी यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

तसेच ज्योती कलानी या राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या पत्नी आहेत. कलानी कुटुंब हे कोणे एके काळी शरद पवारांचे निकटवर्तीय होते. चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांना 2013 मध्ये एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यानंतर कलानी कुटुंब पवारांपासून दूर झाले असून आता ज्योती कलानी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे उल्हासनरात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

COMMENTS