काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का, आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर ?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का, आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सुजय विखे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान रणजित सिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते येत्या एक-दोन दिवसात रणजित सिंह मोहिते पाटील हे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

तसेच विजयसिंह मोहिते-पाटलांनी आज अकलूजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मोहिते पाटील समर्थक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS